'सेठजी मेरी पगार कब बढाऐंगे?' परत ऐकायला मिळणार; 'तारक मेहता'मध्ये काकांचं कमबॅक
तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत काका-भाच्याची जुगलबंदी पुन्हा पाहायला मिळणार आहे. कारण आजारपणामुळे सुट्टीवर असलेले 'काका' लवकरच मालिकेच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

मुंबई 13 ऑक्टोबर: सेठजी मेरी पगार कब बढाओगे? हा लोकप्रिय डायलॉक तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)मध्ये पुन्हा ऐकायला मिळणार आहे. कारण, सीरिअलमध्ये नट्टू काकांचं (Nattu Kaka) पुन्हा आगमन होणार आहे. नट्टू काकांची भूमिका साकारणाऱ्या घनश्याम नायक (Ghanashyam Nayak) यांच्यावर सर्जरी झाली होती. पण आता ते पूर्ण बरे झाले असून आपल्याला हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'तारक मेहता का उल्टा चश्मा'ची संपूर्ण टीम नट्टू काकांच्या कमबॅकची वाट बघत होती.
नवरात्रीनंतर प्रदर्शित होणाऱ्या एपिसोड्समध्ये 'नट्टू काका' दिसणार आहेत. त्यामुळे नट्टू काकांच्या चाहत्यांना अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे. घनश्याम नायक यांच्यासोबत बातचित करताना त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या सीरिअलची एका खास आठवण सांगितली. घनश्याम नायक यांना आधी वेगळ्याच भूमिकेसाठी सीरिअलमध्ये घेण्यात आलं होतं. पण जेव्हा गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम करणाऱ्या आणि वयाने मोठ्या असणाऱ्या कलाकाराचा शोध सुरू झाला तेव्हा, दीलिप जोशी यांनी निर्मात्यांना घनश्याम नायक यांचं नाव सुचवलं. दीलिप जोशी यांनी असंही सांगितलं की, घनश्याम नट्टू काकांची भूमिका चांगली साकारू शकतील. मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनाही हा पर्याय आवडला. आणि नट्टू काकांच्या भूमिकेसाठी घनश्याम नायक यांचं नाव निश्चित झालं.
घनश्याम नायक यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला 1960 सालीच सुरुवात झाली होती. मासूम या चित्रपटामध्ये त्यांनी बालकलाकाराची भूमिका साकारली होती. घनश्याम नायक यांनी तेरे नाम, घातक, चायना गेट, बरसात, आंदोलन, खाकी, शिकारी, क्रांतिवीर, तिरंगा, हम दिल दे चुके सनम अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकले आहेत. हिंदीसोबतच गुजराती इंडस्ट्रीमध्ये घनश्याम नायक यांनी नाव कमवलं आहे.
Reviewed by square daily updates
on
October 14, 2020
Rating:
No comments: