राफेल नदालः फ्रेंच ओपनमध्ये 'नदालशाही'च! विसाव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची कमाई

 

राफेल नदालः फ्रेंच ओपनमध्ये 'नदालशाही'च! विसाव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची कमाई



क्ले कोर्टवरचं वर्चस्व अबाधित राखत राफेल नदालने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या फायनलमध्ये नोव्हाक जोकोव्हिचला नमवत जेतेपदावर नाव कोरलं.

नदालने जोकोव्हिचवर सरळ सेट्समध्ये 6-0, 6-2, 7-5 असा विजय मिळवला.

फ्रेंच ओपन स्पर्धेचं नदालचं हे 13वं जेतेपद आहे. नदालचे हे विसावं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. या जेतेपदासह नदालने रॉजर फेडररच्या 20 ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

नदालने ऑस्ट्रेलियन ओपन एकदा जिंकली आहे. फ्रेंच ओपन विक्रमी 13वेळा जिंकली आहे. विम्बलडन स्पर्धेचं जेतेपद दोनवेळा तर युएस ओपन जेतेपद चारवेळा पटकावलं आहे.

नदाल-जोकोव्हिच 55 वेळा आमनेसामने आले आहेत. जोकोव्हिच 29-26 असा आघाडीवर होता. मात्र क्ले कोर्टवर नदालचं वर्चस्व राहिलं आहे.

ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत नदाल-जोकोव्हिच नवव्यांदा आमनेसामने आले आहेत.

नदालच्या खेळाची वैशिष्ट्ये

नदाल डावखुरा आहे. तो फटके लगावतो ते समोरच्या खेळाडूच्या विरुद्ध दिशेने जातात. उदाहरणार्थ नदालचा फोरहँड उजव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूसाठी बॅकहँडच्या पट्ट्यात येतो. त्याला एका बाजूला जाऊन खेळणं भाग पडतं. त्याचं संतुलन हरवतं. पुढचा फटका मारण्यासाठी कोर्टची दुसरी बाजू गाठेपर्यंत त्याची दमछाक उडते. डावखुरं असण्याचा नदाल पुरेपूर फायदा उठवतो.

सर्व्हिस हा टेनिसचा कणा आहे. टेनिसपटू पहिली सर्व्हिस कशी करतो यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. नदाल इथेही वेगळा आहे. दुसरी सर्व्हिस हे नदालचं वैशिष्ट्य आहे. प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करण्यासाठी नदालचा याचा उपयोग करतो.

पॉवरगेम हे नदालच्या खेळाची ओळख आहे. नदालच्या फटक्यातली ताकद समोरच्याला खेळाडूला लेचंपेचं करून टाकते. मात्र त्याचवेळी नदालच्या शरीराची लवचिकता विलक्षण आहे. दुखापतींनी कितीही जर्जर केलं असलं तरी तरी चेंडू परतावण्यासाठी नदाल संपूर्ण कोर्टभर पळत असतो. आपण लगावलेला फटका नदालच्या टप्प्यात नाही असा विचार प्रतिस्पर्धी करतात मात्र नदाल कोर्टच्या कुठच्याही भागात वेगाने सरसावतो आणि चेंडू परतावून लावतो.

प्रदीर्घ काळ चालणाऱ्या रॅलीत प्रतिस्पर्ध्याला दमवून टाकण्यात नदाल वाकबगार आहे. टेनिस हा दमसासाची परीक्षा पाहणारा खेळ आहे. उष्ण आणि दमट वातावरणात टेनिस खेळणं अवघड आहे. त्यात नदालच्या शरीरला दुखापतींचा वेढा आहे. परंतु टेनिसचा सच्चा पाईक असणारा नदाल खेळत राहतो. आव्हानांना, अडथळ्यांना पार करत झुंजत राहतो. त्याची इच्छाशक्ती केवळ खेळ जगतातल्या नव्हे तर सर्वसामान्य चाहत्यांनाही प्रेरणादायी ठरते.

राफेल नदालः फ्रेंच ओपनमध्ये 'नदालशाही'च! विसाव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची कमाई राफेल नदालः फ्रेंच ओपनमध्ये 'नदालशाही'च! विसाव्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची कमाई Reviewed by square daily updates on October 12, 2020 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.
User-Agent: * Allow: /ads/preferences/ Allow: /gpt/ Allow: /pagead/show_ads.js Allow: /pagead/js/adsbygoogle.js Allow: /pagead/js/*/show_ads_impl.js Allow: /static/glade.js Allow: /static/glade/ Allow: /tag/js/ Disallow: / Noindex: /