मंगळ ग्रह आज पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ, किती वर्षांनी ही घटना घडतेय?

 

मंगळ ग्रह आज पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ, किती वर्षांनी ही घटना घडतेय?



अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा'च्या माहितीनुसार, आज (13 ऑक्टोबर) मंगळ ग्रह पृथ्वीवरून तर सर्वांत मोठा आणि तेजस्वी दिसेल.

खरंतर ही खगोलजगतातील दुर्लभ घटना असेल. कारण आज मंगळ, पृथ्वी आणि सूर्य सरळ रेषेत येतील. म्हणजेच, हे तिन्ही ग्रह 180 अंशाच्या कोनात असतील.

या घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत मंगळ ग्रहाचं 'अपोझिशन' म्हणजेच 'प्रतियुती' म्हणतात. ही अपोझिशनची घटना 26 महिन्यांनी एकदा येते.

'नासा'च्या माहितीनुसार, "मंगळ ग्रह आणि पृथ्वी एकमेकांच्या जवळ येण्याची खगोलीय घटना जवळपास 26 महिन्यांनी होते. त्यामुळे आता डिसेंबर 2022 पर्यंत पृथ्वी आणि मंगळ पुन्हा जवळ येणार नाहीत."



'अपोझिशन'ची घटना भलेही आज असेल, पण पृथ्वी आणि मंगळ गेल्या मंगळवारीच म्हणजे 6 ऑक्टोबरलाच एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र, जवळ येऊन दोन्ही ग्रहांमधील अंतर 38.6 मिलियन मैल होतं. आता 2035 पर्यंत पृथ्वी आणि मंगळ पुन्हा एकमेकांच्या इतक्या जवळ येणार नाहीत.

2003 मध्ये मंगळ ग्रह पृथ्वीच्या 34.8 मिलिनय मैल इतक्या अंतरावर आला होता. 59,619 वर्षांमध्ये पहिल्यांदाच ही घटना घडली होती. आता 2287 वर्षं तरी पुन्हा इतका जवळ मंगळ ग्रह येणार नाही.

या घटनेला खगोलशास्त्रात 'मार्स क्लोज अॅप्रोच' म्हणतात. जेव्हा कधी 'मार्स क्लोज अॅप्रोच'ची घटना घडते, तेव्हा नेहमीच अफवा पसरवल्या जातात की, मंगळ ग्रह रात्री चंद्राइतका मोठा दिसेल. पण त्यात तथ्य नाही.

टेलिस्कोपच्या मदतीने नक्कीच तुम्ही नीट पाहू शकता, जर तुम्हाला पाहायचंच असेल तर. शिवाय, तुमच्या जवळपास कुठे अंतराळ संशोधन केंद्र असेल तर तिथूनही पाहू शकता.

मंगळावर जाण्याची मोहीम या घटनेच्या अनुषंगाने ठरवली जाते. कारण या घटनेच्या कालावधीत मोहीम आखण्यात आल्यास कमी अंतर कापावं लागतं आणि वेळही वाचतो. शिवाय, तिथवर पोहोचवण्यासाठीची सर्वप्रकारची ऊर्जाही वाचते.

आतापर्यंत मंगळ ग्रहाच्या तीन मोहिमा सक्रीय आहेत. या तिन्ही मोहिमा याच वर्षी जुलैमध्ये पाठवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये संयुक्त अरब अमिरातचं 'होम' ऑर्बिटर, चीनचं 'तियानवेन' ऑर्बिरट आणि रोव्हर, तर अमेरिकेचं 'पर्सिवियरेंस' रोव्हर यांचा समावेश आहे.



युरोप आणि रशियानेही रोजालिंड फ्रँकलिन रोव्हर पाठवण्याचा विचार केला होता. मात्र, ते मंगळ ग्रहासाठीचं मिशन लॉन्च करू शकले नाहीत. त्यांना आता 2022 सालाची वाट पाहावी लागेल.

ग्रहांना सरळ रेषेत येण्यासाठी 26 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे इतका वेळ मोहिमा थांबवाव्याच लागतात.

यूएई, चीन आणि अमेरिकेचं मिशन फेब्रुवारी 2021 मध्ये मंगळ ग्रहावर पोहोचतील.

याआधी 'मार्स क्लोज अॅप्रोच'ची घटना 31 जुलै 2018 मध्ये घडलेली. त्यावेळी मे 2018 मध्ये नासाने मंगळ ग्रहाचं मिशन लॉन्च केलं होतं.

पृथ्वी आणि मंगळ ग्रहामधील अंतरातील हा फरक अंडाकृती कक्षेमुळे होत राहतो. दुसऱ्या ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण क्षमतेमुळे ग्रहांच्या कक्षांमध्ये बारीक-सारीक बदल घडतच असतात.



मंगळ ग्रहाला 'लाल ग्रह' म्हणूनही ओळखलं जातं. कारण मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर आयर्न ऑक्साईड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा ग्रह लालसर दिसतो.

आकाशगंगेतील सर्वांत लहान ग्रह म्हणजे मंगळ ग्रह. पृथ्वीप्रमाणेच मंगळ ग्रहावर उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत. इथला मोठा भाग बर्फाच्छादित आहे. वजा 140 डिग्री सेल्सीअसपर्यंत तापमान मंगळ ग्रहावर पोहोचतं. तर सर्वाधिक तापमान 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं.

मंगळ ग्रहावर 25 तासांपेक्षा थोडा अधिक वेळाचा एक दिवस असतो. मात्र, पृथ्वीच्या तुलनेत तिथे एक वर्ष जवळपास दुप्पट आहे. कारण सूर्याची परिक्रमा करण्यासाठी मंगळ ग्रहाला 687 दिवस लागतात.

मंगळ ग्रह आज पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ, किती वर्षांनी ही घटना घडतेय? मंगळ ग्रह आज पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ, किती वर्षांनी ही घटना घडतेय? Reviewed by square daily updates on October 12, 2020 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.
User-Agent: * Allow: /ads/preferences/ Allow: /gpt/ Allow: /pagead/show_ads.js Allow: /pagead/js/adsbygoogle.js Allow: /pagead/js/*/show_ads_impl.js Allow: /static/glade.js Allow: /static/glade/ Allow: /tag/js/ Disallow: / Noindex: /